सामाजिक समतेचाअग्रदूत
- gramasthlive
- Oct 21, 2025
- 3 min read
आणि सहनशिलतेचा महामेरू, सुशील व विनम्र व्यक्तिमत्व असलेला सामाजिक समतेचा अग्रदूत चाळीसगावकरांना सोडून गेला.राजीव देशमुख यांचे जाणे हे एका कुटुबाचे किंवा एका समाजाचे दुःख नाही तर राजीव देशमुख यांचे जाणे चाळीसगाव तालुक्यातील सर्व जाती,धर्माच्या लोकांचं दुःख आहे कैलासवासी अनिलदादांनी हयात असताना राजकारण आणि समाजकारण करताना जी विचारधारा जोपासली होती तीच त्यांची विचारधारा त्यांच्यानंतर राजीव देशमुख यांनी राजकारण आणि समाजकारण करताना जोपासली त्यामुळे राजीव देशमुख यांच्या रूपात दादासाहेब अनिल देशमुख या तालुक्याचे नेतृत्व करत असल्याचे तालुका वाशियांना दिसत होतं राजीव देशमुख यांचे निवासस्थान "राजगड" हे देशमुख कुटुंबाविषयीच श्रद्धेच आणि विश्वासाचं प्रतिक ठरल्यानेच या ठिकाणी आलेल्या व्यक्तीला आपल्याला न्याय मिळेल, आपलं काम होईल, याविषयी आत्मविश्वास असायचा .अर्थात तालुक्यातल्या जनतेच्या श्रद्धेला आणि विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी राजीव देशमुख यांनी सतत घेतली म्हणूनच सत्तेच्या बाहेर असतानाही त्यांची लोकप्रियता कुठे कमी झाली नाही अनेकांनी त्यांच्याविषयी समज, गैरसमज तालुक्यातल्या जनतेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला तालुक्यातील जनता बळी पडली नाही. राजीव देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातलेच नव्हेतर जिल्ह्यातले पहिले माजी आमदार असतील ज्यांच्याजवळ कोणतीही सत्ता नसताना लोकांचे प्रेम कुठे कमी झाले नाही तर ते वाढतच गेले.२००९ लाआमदार झाल्यानंतर चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी आणि या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजीव देशमुख यांनी प्रचंड योगदान दिले. विविध विकास प्रकल्पांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणला मात्र आपल्या कामाचा त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही किंवा कुठेही "राजीव देशमुख यांच्या संकल्पनेतून" असा बोर्ड लावला नाही. बॅनरबाजी केली नाही. इतकेच नव्हे तर सत्तेची गुरमी त्यांनी कधीही दाखविली नाही. विरोधकांनी केलेली टीका त्यांनी सहन केली नुसती सहनच केली नाही तर ती संयमाने पचवली. विधानसभेच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्यानंतरही पराभवाचे खापर कुणावर न फोडता अत्यंत संयमाने पराभवाचे विष त्यांनी पचवले आणि 2014 नंतरही तालुक्यातील जनतेचे सेवेत ते सतत कार्यरत राहिले. युवकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आणि म्हणून चाळीशी ओलांडल्यानंतरही शहर व तालुक्यातील युवक त्यांना आपले नेते मानत होते व शेवटपर्यंत मानत राहिले अलीकडच्या दोन वर्षात सत्तेच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली या पडझडीत चाळीसगाव तालुक्याला मोठी किंमत मोजावी लागेल असं वाटत असताना तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बालेकिल्लाला कुठेही तडा गेला नाही याचं सारं श्रेय एकट्या राजीव देशमुख यांचाच आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांचा राजीव देशमुख यांच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला .दुर्दैवाने एका जीवघेण्या आजाराने राजीव देशमुख यांना ग्रासले त्या आजाराशी देखील त्यांनी निकराची झुंज दिली आणि आजारातून ते सावरले देखील. लोकांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आपण आजारातून पूर्णपणे बाहेर पडू आणि पुन्हा लोकसेवेत तेवढ्याच क्षमतेने आणि तत्परतेने येऊ याचा त्यांना विश्वास होता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जर राजीव देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर विरोधातल्या उमेदवाराला निवडणुकीत सहज विजय मिळवता आला नसता कदाचित पराजय देखील पहावा लागला असता राजीव देशमुख यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली त्यांचाही विजय अवघड नव्हता मात्र पक्षांतर्गत गटबाजी, व्यक्तिगत स्वार्थ आणि काही कार्यकर्त्यांच्या मनात असलेली बदल्याची भावना आणि मोठ्या प्रमाणावर मत विकत गेल्याने व बोगस मतदान झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र या पराभवाच्या अनुषंगाने राजीव देशमुख यांनी कुणालाही जबाबदार धरलं नाही आपल्या कार्यकर्त्यांना देखील जाब विचारला नाही .त्यांनी पराजयाचे कारण शोधली आणि पुन्हा नव्या जोमाने तालुक्याच्या जनतेच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं राजीव देशमुख हे चाळीसगाव तालुक्याचे असं नेतृत्व होतं ज्या नेतृत्वामध्ये संयम, सहनशीलता आणि संघटनात्मक कौशल्य या तिन्ही गुणांचा संगम होता त्यांच्यावर विरोधकांनी अनेकदा जहरी टीका केली मात्र विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत राजीव देशमुख कधीच पडले नाही त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारे विरोधात थकले आणि नंतर तेच राजे देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि नेतृत्वाचे गुण गाऊ लागले राजीव देशमुख यांनी कधीही कुणाचा व्यक्तिद्वेष केला नाही. कुणाचे मन दुखणार नाही याची नेहमीच ते काळजी घेत असत. मोठ्यांविषयी आदर हा त्यांचा स्थायीभाव होता असे हे संयमी, सहनशील, दूरदृष्टी आणि विकासाचा ध्यास असलेले अभ्यासू व समतेचा अग्रदूत असलेलं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे या सर्वव्यापी, सर्वस्पर्शी समतेचा अग्रदूत असलेल्या व्यक्तिमत्त्वाला आमची भावपूर्ण आदरांजली.किसनराव जोर्वेकर




Comments