top of page
Search

चाळीसगाव पालिकेवर भाजपचे कमळ फुलले: नगराध्यक्षपदी चव्हाण प्रतिभा मंगेश यांचा ऐतिहासिक विजय,

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • 7 hours ago
  • 2 min read

चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर झालेल्या चुरशीच्या लढतीत आज अधिकृत निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार चव्हाण प्रतिभा मंगेश यांनी ३२,२३८ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीच्या देशमुख पद्मजा राजीव (२६,२२६ मते), आपचे ॲड. राहुल जाधव (४३७ मते) आणि राष्ट्रवादीचे पाटील समाधान भीमराव (३५३ मते) यांचा पराभव केला आहे. प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या निकालात प्रभाग १ मधून करण ईश्वरसिंग सुर्यवंशी (भाजपा - २,२४६ मते) व मनिषा शेखर पाटील (भाजपा - २,२६६ मते), प्रभाग २ मधून राहुल विठ्ठल म्हस्के (शहर विकास आघाडी - १,३८० मते) व वैशाली महेंद्र मोरे (शहर विकास आघाडी - १,५३७ मते), प्रभाग ३ मधून दीपक उत्तमराव पाटील (शहर विकास आघाडी - १,२६१ मते) व स्वाती अजय शिरुडे (भाजपा - १,७१६ मते), प्रभाग ४ मधून हर्षल देविदास चौधरी (भाजपा - २,२८६ मते) व प्राजक्ता भावेश कोठावदे (भाजपा - १,८५७ मते), प्रभाग ५ मधून युवराज भीमराव जाधव (भाजपा - १,७७८ मते) व रूपाली प्रभाकर चौधरी (भाजपा - २,२९० मते), प्रभाग ६ मधून योजना धनंजय पाटील (भाजपा - १,४१० मते) व योगेश श्रीनिवास खंडेलवाल (भाजपा - १,६३८ मते), प्रभाग ७ मधून राजेंद्र रामदास चौधरी (अपक्ष - १,४२८ मते) व स्वाती राकेश राखूंडे (शहर विकास आघाडी - २,०२६ मते), प्रभाग ८ मधून पायल विशाल कारडा (भाजपा - १,०९६ मते) व सोमसिंग देवसिंग राजपूत (भाजपा - १,६७० मते), प्रभाग ९ मधून विजया प्रकाश पवार (शहर विकास आघाडी - १,४४२ मते) व पूनम धनंजय अहिरे (शहर विकास आघाडी - १,६४० मते), प्रभाग १० मधून भारती प्रवीण मराठे (भाजपा - १,५७२ मते) व संभाजी शिवाजी गवळी (भाजपा - १,३६८ मते), प्रभाग ११ मधून हर्षदा बाळू पवार (भाजपा - १,२४३ मते) व अभय विनायक वाघ (भाजपा - १,४३७ मते), प्रभाग १२ मधून अनिल वाल्मीक चौधरी (भाजपा - २,०८१ मते) व सायली रोशन जाधव (अपक्ष - २,३६७ मते), प्रभाग १३ मधून फकिराबेग जमालवेग मिर्झा (भाजपा - २,३५० मते) व मेघा मुकेश चौधरी (भाजपा - १,८९८ मते), प्रभाग १४ मधून इमरान शब्बीर शेख (शहर विकास आघाडी - २,००६ मते) व रुबीना अमजद खान (भाजपा - १,९६५ मते), प्रभाग १५ मधून शेख वसीम रज्जाक (भाजपा - १,३१० मते) व नलिनी अमोल चौधरी (भाजपा - १,६६४ मते), प्रभाग १६ मधून अभिषेक राजीव देशमुख (शहर विकास आघाडी - १,८२१ मते) व राजश्री दीपक राजपूत (शहर विकास आघाडी - १,८०६ मते), प्रभाग १७ मधून उज्वला विशाल राजपूत (भाजपा - १,६३० मते) व प्रशांत शामराव कुमावत (भाजपा - २,१०६ मते) आणि प्रभाग १८ मधून सविता सूर्यकांत ठाकूर (शहर विकास आघाडी - १,१३६ मते) व धर्मा अनिल बच्चे (भाजपा - ७९२ मते) यांनी विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहरात मोठा जल्लोष साजरा केला आहे.

ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव

 
 
 

Recent Posts

See All
गौताळा अभयारण्यात 'चंदनचोरी' पचवण्याचा प्रयत्न? PCCF च्या आदेशाला CCF कडून केराची टोपली; वनविभागात मोठी बंडाळी!

चाळीसगाव (प्रतिनिधी): जागतिक वारसा स्थळांच्या रांगेत असलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या पाटणादेवी–गौताळा अभयारण्यातील मौल्यवान चंदन तस्करीचे प्रकरण आता वनविभागातील अंतर्गत यादवीचे कारण ठरत आहे. या प्र

 
 
 

Comments


bottom of page