top of page
Search

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे बिगुल वाजले; राज्य शासनाकडून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • Writer: gramasthlive
    gramasthlive
  • 3 days ago
  • 2 min read

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे बिगुल वाजले; राज्य शासनाकडून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचा अधिकृत कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केला असून यामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार या प्रभाग रचनेच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कालमर्यादेत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे प्रारुप प्रभाग रचना तयार करणे असून यामध्ये तहसीलदार यांनी गुगल अर्थ नकाशांचा वापर करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्यासाठी २० फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित केली आहे, त्यानंतर संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व त्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करायचे आहे. यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती, ज्यात गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल, ती या प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी ५ मार्च २०२६ पर्यंत करणार असून हा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे ११ मार्च २०२६ पर्यंत मंजुरीसाठी सादर केला जाईल. जिल्हाधिकारी या प्रस्तावाची संक्षिप्त तपासणी करून १७ मार्च २०२६ पर्यंत तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि निवडणूक आयोगाची मान्यता व दुरुस्तीची प्रक्रिया २३ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, ज्यावर अंतिम स्वाक्षऱ्या ३० मार्च २०२६ पर्यंत केल्या जातील. प्रभाग रचनेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा हरकती व सूचना मागवण्याचा असून, तहसीलदार ७ एप्रिल २०२६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करतील आणि नागरिकांना आपल्या हरकती सादर करण्यासाठी १३ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत दिली जाईल. प्राप्त झालेल्या सर्व हरकतींवर उपविभागीय अधिकारी २१ एप्रिल २०२६ पर्यंत सुनावणी घेतील आणि आपला अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव २३ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवतील. प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी २८ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील आणि ४ मे २०२६ रोजी या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यापक प्रसिद्धी दिली जाईल, ज्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असून या आदेशामुळे राज्यातील महसूल आणि ग्रामविकास यंत्रणा कामाला लागली आहे.

ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव

 
 
 

Comments


bottom of page