शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ५ नोव्हेंबरला
- gramasthlive
- Nov 4, 2024
- 1 min read

शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी (५ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यती आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही वेळा हे प्रकरण पटलावर होते मात्र यावर सुनावणी होऊ शकली नाही.दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे तसेच सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे येत्या १० तारखेला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे यावेळी तरी या प्रकरणावर सुनावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या तारखा एकत्र पडत आहेत. मात्र यावर सुनावणी होऊ शकलेली नाही.



Comments