रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी !
- gramasthlive
- Nov 4, 2024
- 1 min read

मुंबई - राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने हकालपट्टी केली आहे शुक्ला यांच्या संदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्या निवडणुकीच्या काळात पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप केलेला होता या आरोपाच्या अनुषंगाने शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे आपले कर्तव्य पार पाडावे ,पक्षपातीपणा करू नये असा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना दिला आहे . रश्मी शुक्ला या यापूर्वीही वादग्रस्त ठरलेल्या आहेत त्यांना निवृत्तीनंतर दोन वर्षाची मुदतवाढ राज्यातल्या महायुतीच्या सरकारने दिली होती ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेला होता रश्मी शुक्ला या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातल्या अधिकारी आहेत म्हणून त्यांना निवृत्तीनंतर मुदतवाढ देऊन राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती



Comments