टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह: रस्त्यांची कामे निकृष्ट, गौण खनिजाची रॉयल्टी बुडवली!
- gramasthlive
- Dec 10, 2025
- 2 min read
चाळीसगाव - टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जाहिन साहित्याचा वापर होत असून, कामांसाठी वापरले जाणारे दगड, मुरुम, वाळू या गौण खनिजाची शासनाला रॉयल्टी भरलेली नाही, असा गंभीर प्रकार समोर आला आहे. टाकळी प्र.चा. मधील साईज कॉलनी परिसर तसेच सैनिक कॉलनीतील अंगणवाडीच्या राणीच्या भागात ही रस्त्यांची कामे सुरू आहेत.या कामांसाठी वापरला जाणारा दगड, मुरुम, आणि गिट्टी अवैध असून, कार्यक्षेत्रातील ४० ते ५० ट्रॉली दगड-मुरुमाच्या वाहतुकीची कोणतीही परवानगी ठेकेदार गौरव सुनील भोरे व ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडून घेतलेली नाही. तसेच, गौण खनिजाची कोणतीही रॉयल्टी भरलेली नाही. यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदारांनी शासनाचा महसूल बुडवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यापूर्वी, म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वी, ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जी रस्त्यांची आणि गटारींची कामे झाली, त्या कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर वाळू वापरण्यात आला आहे. तसेच रस्त्यांच्या कामांवर देखील दगड, मुरुम आणि वाळूचा वापर झालेला आहे, जो केवळ १०० ते १५० बस झालेला असून याची कोणतीही रॉयल्टी ग्रामपंचायतीने चाळीसगाव कराळ्याला अदा केली नाही व गौण खनिज वाहतुकीची व वापराची परवानगी देखील घेतलेली नाही. याबाबत पुराव्यानिशी तक्रारी करूनही महसूल विभागामार्फत कोणतीही कारवाई केली जात नाही.
महसूल विभागातील दुर्लक्ष आणि तलाठ्याची कार्यपद्धती:
महसूल अधिकारी (तलाठी) महेंद्र पाटील यांचे प्रशस्त असे निवासस्थानाचे काम गेल्या सहा-सात महिन्यांपासून हद्दीत सुरू आहे. या कामासाठी जी वाळू, दगड, मुरुम वापरण्यात आले आहेत, त्यांची किंमतही अधिक आहे. मुरुम हे अवैध वाहतुकीचे आणि वाळू तस्करांकडून मोफत घेतले जात आहेत. त्या बदल्यात महेंद्र पाटील वाळू चोरांवर कोणतीही कारवाई करत नाहीत. महेंद्र पाटील यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव यांच्याकडे देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही, मात्र कारवाईचे कागदी घोडे पास नाथवले जात आहेत. महेंद्र पाटील यांनी कसूर केलेला आहे व याबाबत पुराव्यानिशी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता:
कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या, गटारींच्या कामात प्रचंड प्रकारचे घोळ आहेत. झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. काही ठिकाणी कामे न करताच कामांची बिले काढण्यात आली. जी कामे झाली आहेत, ती कोणत्या निधीतून करण्यात आली आहेत, झालेल्या कामावर किती खर्च झालेला आहे याची कोणतीही माहिती मिटीसमध्ये दिली जात नाही. ग्रामसभेतही झालेल्या कामांची व त्यावर झालेल्या खर्चाची माहिती दिली जात नाही.सरपंच आणि ग्रामसेवकावर गंभीर आरोप:सरपंच प्रमिला पवार यांचे पती विजय पवार हे सरपंच म्हणून काम पाहतात, चेक व्यवहारांवर सरपंच म्हणून पत्नीची सही करतात. विजय पवार हे टाकळी प्र.चा. येथे राहत नाहीत, जळगाव-चाळीसगाव असे रेल्वेने येतात व जातात, तरीही शासनाकडून घरभाडे भत्ता घेतात. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ते झालेल्या कामांचे पार्ट पेमेंट काढतात आणि ते विजय पवार सांगतील त्या कागदांवर सह्या करतात.ग्रामसेवकाची मनमानी:ग्रामसेवक सचिन सांगळे हे आठवड्यातून एक-दोन दिवस टाकळी प्र.चा. ला येतात, सरपंचाच्या घरी बसतात किंवा झाडाखाली बसून काम करतात. गावात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. लोकांना १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे, तेही अशुद्ध दिले जाते. गटविकास अधिकारी अन्सार शेख हे येत्या एक-दोन महिन्यात निवृत्त होत आहेत, त्यामुळे जेवढे मिळेल तेवढे घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने ते भ्रष्ट ग्रामसेवकाविरुद्ध आणि सरपंच व संबंधितांविरुद्ध कारवाई करत नाहीत. अन्सार शेख यांना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी टाकळी प्र.चा. ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने झालेल्या तक्रारींची तात्काळ चौकशी करण्याचा व ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा आदेश देऊनही अन्सार शेख आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत कारण त्यांच्याच बुडाखाली जळत आहे.पुढील आठवड्यात अन्सार शेख यांच्याही भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्वांना ग्रामस्थ मधून क्रमशः प्रकाशित केली जाणार आहेत.
ग्रामस्थ लाईव्ह
संपादक: किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क: बबलु आहिरे, चाळीसगाव










Comments