चाळीसगाव: शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख यांच्या जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवर्तनाचे वारे!
- gramasthlive
- Nov 13, 2025
- 2 min read
चाळीसगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शहरात राजकीय वातावरण तापले आहे. शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती पद्मजा राजीव देशमुख यांनी आपल्या प्रभागनिहाय जनसंपर्क अभियानातून चाळीसगावातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभियानाला शहरवासीयांकडून अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.कै. माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांनी घेतलेली विकासाची धुरा जनतेला भावली आहे. त्यांच्या साधेपणामुळे, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि विकासाच्या तळमळीमुळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या दौऱ्यात सहभागी होत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट श्रीमती पद्मजा देशमुख यांच्या या जनसंपर्क अभियानात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे आणि शहर विकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होत आहेत. नेत्यांची ही एकजूट आघाडीला मोठे बळ देत आहे.
अभियानात सहभागी असलेले प्रमुख चेहरे:
माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी
समाजशिल्पी परिवाराचे प्रमुख व शहर विकास आघाडीचे मुख्य समन्वयक प्रदीप दादा देशमुख कै. राजीव देशमुख यांचे चिरंजीव अभिषेक देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रदेश संघटक शशिकांत साळुंखे, तालुका अध्यक्ष दिनेश पाटील व शहराध्यक्ष श्याम देशमुख
उबाटा (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेंद्र पाटील, रमेश चव्हाण, नानाभाऊ कुमावत, घृष्णेश्वर पाटील, शैलेंद्र सातपुते, सविता कुमावत
काँग्रेस पक्षाचे नेते अशोक खलाणे
या सर्व नेत्यांच्या आणि शहर विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांच्या उपस्थितीमुळे प्रत्येक प्रभागातील सभांना कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.विकासाच्या भूमिकेवर लक्ष श्रीमती पद्मजा देशमुख प्रत्येक सभेत चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाची आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही देत आहेत. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि जनहिताचे निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्या वारंवार स्पष्ट करत आहेत. त्यांचे हे आवाहन जनतेला पटेल असून, आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच नागरिक मतदान करतील, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.विशेषतः महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे, जो परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक संकेत देत आहे.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक: किसनराव जोर्वेकर
संपर्कासाठी: महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे, चाळीसगाव










Comments