ग्रामीण कारागिरांना न्याय देत संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार - चेअरमन किसनराव जोर्वेकर यांचे आश्वासन
- gramasthlive
- Oct 19, 2025
- 2 min read
वृत्तसंस्था:-चाळीसगाव, दि. १९ ऑक्टोबर:येथील चाळीसगाव तालुका वि.का.सह.ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण कारागिरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संस्थेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन संस्थेचे चेअरमन श्री. किसनराव जोर्वेकर यांनी आज दिले. संस्थेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आज सकाळी ठीक ११ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात चेअरमन किसनराव जोर्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हाईस चेअरमन हिम्मत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची मासिक सभा संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी, संस्थेचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले, ज्यास उपस्थित सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. यानंतर, सद्यस्थितीतील विषयपत्रिकेवरील सर्व विषय सचिवांनी सविस्तरपणे मांडले.या बैठकीत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासद असलेल्या ग्रामीण कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभ कर्जपुरवठा करणे, संस्थेचे भागभांडवल वाढवणे, तसेच संस्थेच्या भावी वाटचालीस दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. जवळपास दोन तास चाललेल्या या सभेत सर्व संचालकांनी आपापली मते आणि सूचना मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. चर्चेअंती विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मान्यता देण्यात आली.याच बैठकीत संस्थेवर नवनियुक्त झालेल्या स्वीकृत संचालक - श्री. रमेश पुजू शिंपी, श्री. सच्चिदानंद भाऊराव जाधव, श्री. चंद्रकांत रामभाऊ चौधरी आणि श्री. आशिष सानप यांचे संचालक श्री. भीमराव खलाणे यांनी सर्व संचालकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सर्व संचालकांच्या सूचना समजावून घेतल्यानंतर चेअरमन जोर्वेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांना आश्वासित केले की, "सर्व संचालकांनी मांडलेल्या सूचना अत्यंत मोलाच्या आहेत. या सूचनांचा गांभीर्याने विचार करून संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची आणि त्याचबरोबर संस्थेला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व समृद्ध करण्याची भूमिका आगामी काळात घेतली जाईल."या सभेस संचालक श्री. शालीकराम कुंभार, श्री. संजय सोनार, श्री. गणेश सोनवणे, श्री. दगडू रुपचंद ढगे, सौ. सुनिता भिमराव खलाणे, सौ. संगिता कैलास मांडोळे यांच्यासह सर्व नवनियुक्त स्वीकृत संचालक उपस्थित होते.
ग्रामस्थ लाईव्ह
संपादक: किसनराव जोर्वेकर
बातमीसाठी संपर्क:
महेंद्र सूर्यवंशी, बबलू अहिरे, चाळीसगाव






Comments