चाळीसगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन पुर्ण-प्रमोद हिले
- gramasthlive
- Nov 11, 2025
- 1 min read
चाळीसगांव: चाळीसगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची पूर्वतयारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूकीसाठी प्रशासनाने कशा पध्दतीने नियोजन केले आहे याची माहिती दिली.१० नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू पत्र असेल. नामनिर्देशन ऑनलाईन भरावयाचे असुन त्याची प्रिंट आणि त्यासोबत शपथपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मुदतीत सादर करावयाची आहेत असे हिले साहेबांनी बैठकीत सांगितले.नामनिर्देशन पत्र स्विकारण्यासाठी ९ टेबल लावण्यात आले असल्याचे व प्रत्येक टेबलावर दोन प्रभागांचे नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक छाननी केली जाणार आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कंट्रोल रूमची स्थापना नगरपरिषदेच्या कार्यालयात करण्यात आली असून याठिकाणी तीन व्हिडिओ चित्रीकरण पथक, दोन भरारी पथक, दोन व्हिडिओ तपासणी पथक व दोन स्थिर सर्व्हेक्षण पथक स्थापन करण्यात आले आहे. उमेदवारांना विविध परवानग्या तात्काळ उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना कार्यरत करण्यात आली आहे.याठिकाणी सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.१७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे.निवडणूक कालावधीत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेल यांच्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी यांची संयुक्त सभा देखील झाल्याचे प्रमोद हिले यांनी सांगितले.निवडणुकीच्या कामकाजात तहसिलदार प्रशांत पाटील, नायब तहसिलदार निवडणुक - २०२५ निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदेश निकुंभ, प्रविण मोरे, चाळीसगांव न.पा. चे मुख्याधिकारी सौरभ जोशी, योगेश मांडोंळे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांचे सहकार्य लाभत असल्याचेही हिले यांनी सांगितले.निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद हिले आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाळीसगांव न.पा.चे मुख्याधिकारी सौरभ जोशी हे काम पहात आहेत.






Comments