गौताळा चंदन तस्करी प्रकरणाची चौकशी थेट मुख्य वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे!
- gramasthlive
- Nov 22, 2025
- 1 min read
चाळीसगाव :-
PCCF (वन्यजीव) यांचा अभूतपूर्व निर्णय: प्राथमिक तपासातील गंभीर त्रुटींमुळे उच्चस्तरीय तपासणीचे आदेश.
गौताळा–आउट्रम घाट (पाटणदेवी) येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणी 'क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन'च्या तक्रारीची मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी थेट दखल घेतली आहे.
वन्यजीव विंगच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाला वळसा घालून, या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी थेट मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सोपवली आहे. वन प्रशासनात अशा प्रकारे तपास थेट टेरिटोरियल (प्रादेशिक) विंगकडे सोपवणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.प्राथमिक तपासावर अविश्वास असण्याची कारणे:तक्रारीत नमूद असलेल्या खालील गंभीर मुद्द्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घेतली आहे, ज्यामुळे प्राथमिक तपास विश्वसनीय नसल्याचे स्पष्ट झाले आहे:चंदन वृक्षांच्या संख्येत मोठी तफावत.पंचनाम्यातील विरोधाभास आणि चुकीची माहिती.घटनांची चुकीची नोंद व अहवालांतील तीव्र विसंगती.स्थळ माहितीच चुकीची असल्याचे संकेत.संबंधित अधिकाऱ्यांकडून अत्यंत गंभीर त्रुटी आणि दिशाभूल. आता होणार सखोल व स्वतंत्र चौकशी:आदेशानुसार, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर हे नोंदींची पुनर्पडताळणी, स्थळ निरीक्षणाचे पुनर्मूल्यांकन, पंचनाम्यातील विसंगतींची चौकशी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्याने करतील.प्राथमिक तपासातील त्रुटी आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहता, आता हा तपास वरिष्ठ प्रादेशिक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली गेला आहे. या चौकशीकडे सर्व पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक: किसनराव जोर्वेकर
संपर्क: महेंद्र सूर्यवंशी, बबलू अहिरे (चाळीसगाव)





Comments